पुलगाव ते आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून वर्धा-आमला पर्यंत वाढवा

वर्धा – संसदेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात रेल्वे संबंधी अनेक मागण्या मांडल्या। त्यात प्रामुख्याने आर्वी ते पुलगाव या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरुड-आमला पर्यंत वाढवण्याबाबतची प्रमुख मागणी होती। आपली मागणी मांडतांना त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदार संघ असून त्यातील पाच मतदार संघ हे रेल्वे मार्गाशी जोडले गेले असून केवळ आर्वी हा एकच मतदार संघ असा आहे, ज्या मतदार संघात रेल्वेची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही।

पुलगाववरून आर्वी पर्यंत जाण्यासाठी ब्रिटीशकाळात नॅरोगेज लाईन टाकण्यात आली होती व त्यावरून आर्वी-पुलगाव ही एकच गाडी धावत होती। जिल्हा लोक शकुंतला नावाने ओळखली जात होती। परंतु आज २० वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही गाडी सुद्धा बंद करून आर्वी विधानसभा मतदारसंघाचा रेल्वे मार्गाशी असलेला संबंध संपुष्टात आणला। आर्वी ही कापसाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे। येथून कापसापासून तयार केलेल्या रुईच्या गाठी मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात व या कारणास्तवच शकुंतला नावाची रेल्वेगाडी या रूळावर धावत होती जी नागपूर-मुंबई या मध्यरेल्वे लाईनला जोडली गेली होती।

आजही नेरोगेज रेल्वेलाईन्स तशीच्या तशी असून कुठलेही भू-संपादन आवश्यक नसताना केवळ नेरोगेज लाईन्सचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये करुन मध्यरेल्वे लाईनला आर्वी हे शहर जोडल्या जाते. इतकेच नव्हेतर हाच मार्ग पुढे वरुड आमला पर्यंत वाढविल्यास हा मार्ग पुढे दिल्ली येथील केन्द्रीय दारुगोळा भांडार व आमला येथील दारुगोळा भांडार या रेल्वे मार्गामुळे जोडली जाऊन चालू असलेला नागपूर मार्ग प्रवासातील अंतर १०० कि.मी.ने कमी होऊ शकतो. सदर बाब रेल्वे विभागाला वारंवार विशद करुन दिल्यानंतर या ब्रॉडगेज लाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु केवळ मंजुरी देण्याऐवजी या मार्गाचा कामाला कुठलीही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या प्रश्न खासदारांनी अमर कौर यांच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात संधारीत लोकांची रेल्वे प्रवासासंबंधीची अडचण लक्षात घेता ही मागणी मोठ्या पोटतिडकीने संसदेत मांडली. या लाईन्सचे काम सरकारने ताबडतोब केले तर पुलगाव वरुन आमला येथे जाण्यासाठी आणि पुलगाव वासियांना नागपूर मार्गे १०० कि.मी. चा फेरा कमी होऊन मोठा दिलासा मिळेल.

यासोबतच कोविड-१९ च्या काळात रेल्वेने बऱ्याच स्टेशनवरील थांबे बंद करण्यात आले होते. त्यात काचीपुरा एक्सप्रेसचा थांबा, पुलगाव येथील हावडा अहमदाबाद एक्सप्रेसचा थांबा, हिंगणघाट येथील विविध १२ गाड्यांचे थांबे, धामणगाव येथील तसेच तेलंगणा एक्सप्रेसचा सेवाग्राम (वर्धा) स्टेशनवरील थांबा इत्यादी गाड्यांचे थांबे जे कोविड-१९ च्या काळात प्रादुर्भाव मुळे बंद करण्यात आले ते पूर्ववत सुरु करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी आपल्या संसदेतील भाषणात केली. पुलगाव ते आर्वी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करुन हा मार्ग पुढे वरुड-आमला पर्यंत वाढवून या कामाला सुरुवात होऊन हा काम तातकाळ निकाली लागेल अशी अपेक्षा त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *