वर्धा (जिल्हा): हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शिख, सिकीलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. त्या अनुषंगाने पूर्वतयारी व नियोजनाचा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आढावा घेतला.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, महेंद्र शिक्षण अधिकारी गजभिये, शताब्दी वर्षानिमित्त करण्यात
कार्यक्रमाच्या क्षेत्रीय सहसचिव गुरुमुखसिंग बावरी, सदस्य जसवंतसिंग अंधरेले, भदा, करणसिंग सुरजितसिंग अकाली, फिनान्सिंग जोंगीदरसिंग बावरी, आधारवड संस्थेचे प्रा. हाश्शम शेख, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, पतंजली योग पीठाचे दामोधर राऊत, शताब्दी आयोजित रोटरी क्लबच्या अध्यक्षा येणाऱ्या साधना बनरोटे, स्मिता व्यास,सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण आदी उपस्थित होते. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर, नांदेड व नवी मुंबई येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिला कार्यक्रम दि. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.
या कार्यासमास जिल्ह्यातील सिख, सिक्कलीगर, बंजारा, लबाना, मोहायाल व सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. ठिकठिकाणाहून नागपूर येथे जाणाऱ्या भाविकांची वाहतूक व्यवस्था, चहा, पाणी, नास्ता, वैद्यकीय मदत, सुरक्षा आदींसह विविध बाबींचे सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून त्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे जीवनकार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या ३५० व शहीदी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यासोबतच त्यांच्या कार्यावर आधारित चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी.
ठिकठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. नागपूर येथे जाणाऱ्या नागरिकांची संख्या समन्वयकांनी सादर करावी. त्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.