बनावट दारू कारखान्यावर कारवाई, ५ लाख ३१ हजार रुपयांचे साहित्य जप्त

वर्धा : सिंदी (मेघे) परिसरातील एका गोदामात विदेशी दारूची बनावट निर्मितीचा ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. रामनगर पोलिसांनी बनावट विदेशी दारूचा कारखानाच पकडला. रामनगर पोलिसांनी सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या एका गोदामात छापा टाकला.

त्यांना रिकाम्या दारूच्या बाटल्यांसह इतरही बनावट दारूनिर्मितीचे साहित्य मिळून आले. जवळपास २९० दारूच्या पेट्यांसह ५ लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धीरज खोब्रागडे, सहायक उपनिरीक्षक राजू साहू, अजय बनसोड, विक्की अनराव, सूरज राठोड, प्रशांत साहू, भूषण दांडेकर यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *