दरम्यान, सकाळपासूनच यावर चर्चा सुरू होत्या आणि निवडणुकीबाबत नेमकी काय स्थिती याबाबत उत्सुकता दिसत होती. पूर्ण तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा मात्र यामुळे हिरमोड झाला. नगरपरिषद निवडणूक अर्ज अवैध ठरल्यानंतर अनेक ठिकाणी उमेदवारांनी दावे दाखल केले. दाव्यांवरती निकाल अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे नगराध्यक्ष पदासाठी अपील होते. तसेच वर्धा, पुलगाव दोन तर हिंगणघाट नगर परिषदेत तीन ठिकाणी अपील होते. त्या अपील खारीज करण्यात आल्या. न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्थगित असलेल्या निवडणुका सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे. निवडणुकीकरिता रिंगणात असलेल्या उमेदवारांनी तयारी केली. पण ऐन वेळेवर मतदानाला काही तासाचा कालावधी राहिला असताना आयोगाचे आदेश धडकले. यासंदर्भात प्रशासनात बैठकांचे सत्र पार पडले। आयोगाकडून काय निर्देश येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. — सध्या तात्पुरती स्थगित केलेली निवडणूक आता पुढे होणार आहे. आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार देवळी तसेच वर्धा, पुलगाव दोन आणि हिंगणघाट येथील तीन सदस्य जागेकरिता निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे