प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे समुद्रपूर – तालुका प्रतिनिधी शहरातील डायमंड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप बँकेसह इतर दोन दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असल्याची घटना १ डिसेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, डायमंड कॉम्प्लेक्समध्ये दुकाने, बँका आहे. त्यापैकी डायमंड कॉम्प्लेक्सच्या दक्षिण भागात असणाऱ्या वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर दोन दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला. त्यामध्ये बँकेतील तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने तिजोरी तिजोरीत असलेली रक्कम बचावली. वामन फटींग यांच्या पवन हार्डवेअर दुकानाच्या काउंटरमधून १५ हजार रुपये ठेवले होते. ते चोरट्याने लंपास केले. त्यालाच लागून असलेल्या डायमंड कॉम्प्लेक्सचे गोदांम होते.
त्याचेही शटर तोडले. मात्र या ठिकाणी त्यांचे हाती काहीही लागले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार रविंद्र रेवतकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित झाले होते. वर्धवरून फिंगर प्रिंट पथक, श्वान पथक उपस्थित झाले होते. पुढील तपास ठाणेदार रविंद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.