प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे विनोद बाळुजी शेंडे, रा.मांडवगड, ता.जि. वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दि. १५.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०८:०० वा.चे सुमारास इंझापुर ग्रामपंचायत जवळ त्यांनी त्यांची पेंश प्लस मोटारसायक क्रमांक एमएच ३२ एन ६६३१ किंमत ५०,०००/रू ची उभी करून नास्ता करण्याकरीता समोरील टपरीवर गेले असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.ला अप.क. ४२२/२०२६ कलम ३०३(२)बी.एन.एस. प्रमाणे नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात असताना मुखबीरकडून माहिती मिळाली की एक ईसम सावंगी इंजिनियरींग कॉलेज जवळ संशयीतरीत्या एक मोटारसायकल घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून सदर ईसमाचा शोध घेवून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव प्रेम कन्नाके वय २६ रा. इंझापुर, ता.जि. वर्धा असे सांगितले. आरोपीचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरी गेलेली पेंश प्लस मोटारसायक क्रमांक एमएच ३२ एन ६६३१ किंमत ५०,०००/रू ची पंचसमक्ष जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोड झाले, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखिल फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.