चार दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्याच्या दोन्ही संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये मुलींनी साखळी सामन्यांमध्ये चंद्रपूर व अहिल्यानगर या दोन संघांवर एकतर्फी मात करून सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला होता. उपांत्य पूर्व सामना सुद्धा वर्धा जिल्ह्याच्या महिला संघाने मुंबई शहर या संघासोबत जिंकला आणि सरळ उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
उपांत्य सामन्यांमध्ये पुणे या बलाढ्य संघाकडून पराभव जरी पत्करावा लागला परंतु तिसऱ्या बक्षीसासाठी कोल्हापूर या संघासोबत ३-० अशा सेटच्या फरकाने विजय मिळविला, आणि संपूर्ण स्पर्धेत रोष्य पदकवार आपले नाव निश्चित केले.
वर्धा जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे यश वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे यापूर्वी कधीही सीनियर गटमध्ये पहिले दुसरे किंवा तिसरे असे कोणतेही पदक वर्धा जिल्ह्यातील मुल किंवा मुलींना प्राप्त करता आले नाही परंतु वर्धा जिल्ह्यातील गुणी आणि मेहनती खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे आज हे शक्य झाले आहे.
वर्धा जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने सुद्धा साखळी सामन्यातून पूल टॉप करीत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळविला होता.
महिला व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व रक्षा खेंनवर या खेळाडूने केले तर कंचन रघाटाटे, दीक्षा भुजाडे, अश्विनी शास्त्राकार, संतोषी कौंकडी, नव्या चेरे, भूमी रिठे, स्वरा राजूरकर, धनश्री भुजाडे, स्वरा खिरळे, केतकी कंचड, सिमता बनसोड या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. संघाचे मुख्य प्रशिक्षक नितेश अनमूलवार, सहाय्यक प्रशिक्षक, कु. मीनल वहाणे, संघ व्यवस्थापक सचिन पंचभाई यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.