सरकारचे ध्येय प्रत्येक गरजूला घर देणे : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारेसेलू : प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समाजातील प्रत्येक गरजू कुटुंबाला निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. कच्च्या जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्यांना कायदेशीर घरकुल पट्टे देण्याचे कार्य सरकार करीत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथे आयोजित घरकुल पट्टे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या जमिनीवर राहणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने घरकुल पट्टे वितरित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, तहसीलदार डॉ.शंकुतला पाराजे, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, सुकळीच्या सरपंच नीलम जाधव, उपसरपंच प्रमोद तडस तसेच इतर मान्यवर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *