वर्धा यांची धडक कारवाई नाकेबंदी करून विदेशी दारूने भरलेल्या ३६ पेट्या व चारचाकी वाहनासह १२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-वर्धा : वर्धा चे पथक रात्र पेट्रोलिंग करीत असता पथकाला गुप्त माहिती प्राप्त झाली की, गोंड प्लॉट वर्धा येथे राहणारा अभिषेक उर्फ टायगर वाघ हा त्याच्या ताब्यातील एका ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी चारचाकी वाहन क्रमांक MH 14 DX 1854 या कारमध्ये मध्य प्रदेश येथून नागपूर सेलू मार्गे वर्धा येथे विदेशी दारूचा माल अवैधरीतत्या वाहतूक करून घेऊन येत आहे. अशा माहितीवरून पवनार बस स्टॉप येथे नाकेबंदी केली असता. आरोपीला पोलीस दिसताच आरोपीने त्याचे ताब्यातील चार चाकी वाहन पवनार गावामध्ये टाकून गाडी सोडून पळून गेला.

सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिक्कीत व मागील सीटवर ऑफीसर चॉईस कंपनीच्या १२ पेट्या, रॉयल स्टँग कंपनीच्या १२ पेट्या, ऑफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या ५ पेट्या, ओल्ड मंक ट्रिपल एक्स रम कंपनीच्या ७ पेट्या अश्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण ३६ पेट्या विदेशी दारूने भरलेल्या मिळाल्या व एक swift डिझायर कार क्रमांक एमएच १४ डीएक्स १८५४ असा एकूण जु. किं. $₹$ १२,४५,६००/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि राहुल ईटेकर पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंडे, अरविंद इंगोले, सुगम चौधरी, शुभम राऊत राहुल अधवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *