या चर्चेवेळी शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांच्या समवेत अधीक्षक नंदकुमार बोबडे व वरिष्ठ सहाय्यक अमित ठाकरे उपस्थित होते. तर संघटनेच्या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे, जिल्हाध्यक्ष गौतम पाटील, कोषाध्यक्ष अविनाश कांबळे, तालुकाध्यक्ष अजय कुंभारे, सचिव दीपक नगराळे आणि महिला संघटक कल्पना भगत यांचा सहभाग होता.
या चर्चेवेळी वेतनरेणू निधीकरिता टब पाणुपात्रा करणे, प्रसुती रजा मंजूर करणे, उर्वरित विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, मुख्याध्यापकपदी पदोन्नती करणे, डीओपीएसीस सेवानिवृत्त धारकांना सेवानिवृत्तीनंतर लगेच उपदान प्रदान करणे व तालुकास्तरावर बैठकीची आयोजित करण्याविषयी गटशिक्षणाधिकारी यांना आदेशित करणे इत्यादी विषयी चर्चा करण्यात आली. डॉ. महेंद्र गजभिये व अधीक्षक नंदकुमार बोबडे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याबद्दल संघटनेनेचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांनी आभार मानले.