गॅस सिलिंडर लीक असल्यामुळे सिलिंडरने पकडली आग

सेलडोह: गॅस सिलिंडर लीक असल्यामुळे सिलिंडरने आग पकडली… सेलडोह येथील धीरज नेहारे यांच्या घरी मंगळवारला सकाळी १० वाजता त्यांचे आईने स्वयंपाक करण्या करिता गॅस सुरु केला, सिलिंडर आजच घेतला होता.. जसा गॅस सुरु केला तसेच रेग्युलेटर जवळ आग लागली… आग एवढी भिषण होती की पाहता पाहता आगीने रुदरूप धारण केले. घराचे आडे व ईतर लाकडी साहित्य आगीच्या चपेट्यात आले, खाण्यापिण्याच्या वस्तू अन्न धान्य, व घरामध्ये असलेला कापूस जळून खाक झाला, सेलडोह येथील युवक प्रेमचंद खंगारे यांच्या समजुतदारी व साहसी कृत्यामुळे जिवीत हानी टळली, त्यांनी आग लागलेले सिलिंडर घराबाहेर नेले व विझविले.. आग विझविण्याकरिता आकाश जाधव, सुमित सोनटक्के, कान्हा धोंगडे, नागेश वरठी, राजेंद्र नेहारे, ई ने सहकार्य केले.नंतर अग्नी शमन दल यांना प्रचाारण् करण्यात आले.. गावचे कोतवाल तुषार कुसराम यांनी पंचनामा केला आहे..शासना कडून नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी पिडित कुटुंबाकडून केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *