चेक पोस्टमुळे अवैध व्यावसायिकांना धडकी

हिंगणघाट : नगरपरिषद निवडणुका लक्षात घेता निवडणूक प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे येथील नगरपरिषद प्रशासनाने नांदगाव चौैर्सा, नदॊरी चौक, हिंगणघाट ते जाम राष्ट्रीय महामार्ग वर असलेल्या मोहता बगीचाजवळ असे तीन चेक पोस्ट उभारले आहे. हे चेक पोस्ट २४ तास आपले कर्तव्य बजावत असल्याने बाहेरून शहरात येणाऱ्या अवैध व्यावसायिकांना कारवाईची धडकी बसली. त्यामुळे ते इतरत्र मार्ग शोधत असल्याचे बोलले जाते.

या चेक पोस्टवर नगरपरिषद प्रशासनाचे तीन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी असे चार जण कर्तव्य बजावत आहे. विशेष म्हणजे मोहता बगीचाच्या चेक पोस्टवर नागपूर वरून अवैध रित्या ट्रॅव्हल्स बसमध्ये आणणाऱ्या दारू विक्रेत्याला न. प. कर्मचाऱ्यांनी पकडून जिल्ह्यात अशा प्रकारची प्रथम कारवाई केली. नांदगाव चौैर्सा वर सुद्धा चेक पोस्टवर असलेले कर्मचारी कडाक्याच्या थंडी मध्ये सुद्धा आपले कर्तव्य यशस्वीपणे बजावत असल्याचे चित्र शहरात प्रवेश घेणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या लोकांना दिसत असल्याने खरंच या चेक पोस्टचा सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *