सेलू येथील विकास चौकातील जिओ मोबाईल सर्व्हिसचा टॉवर मागील सात ते आठ वर्षांपासून सुरू झाला आहे. मोबाईल सेवा ही सध्या आवश्यक झाली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून या जिओ सर्व्हिसपासून ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या चौकातील वीजपुरवठा बंद झाला की या टॉवरची मोबाईल सेवा लगेच बंद पडते. प्रश्न हा आहे की सदर ठिकाणी जनरेटर आहे की नाही तसेच या टॉवरची देखभाल करण्यासाठी कुणी वाली आहे की नाही? असा संभ्रम ग्राहकांच्या मनात उत्पन्न झाला आहे.
कोणत्याही मोबाईल कंपनी नियमां व अटी घालून दिल्या असल्या तरी खाजगी कंपन्या सरकारी नियम व अटीला तिलांजली देऊन कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचा प्रयत्न सर्रास दिसतो. पण जिओ कंपनी सेवा देतांना मोठ्या प्रमाणात वायफाय व मोबाईल रिचार्ज रक्कम वसूल करीत असून जनतेला असा मनस्ताप देण्याचा प्रकार अतिशय निंदई आहे. अशा प्रकारामुळे जनतेत तीव्र संतोष उफाळला आहे. याबाबत संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। अन्यथा यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सूर ग्राहकांनी व्यक्त केला आहे.