नाचणगाव येथे टेलरिंगच्या दुकानाखाली चालत आहे खुलेआम सट्टा
नाचणगावच्या महिलांना होत आहे त्रास
प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : वर्धा जिल्ह्यात पोलीस प्रशासन दररोज लाखो रुपयांची दारू पकडत आहे. तरीही जिल्ह्यात दारू आणि सट्टा व्यवसायाला उधाण आले आहे. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून दारूबंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारुविक्री होत आहे. यावर पोलीस प्रशासनाचा वचक नाही का, अशी चर्चा चालू असून तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि नुरुुल हसन यांच्या दहशतीची नागरिक आता आठवण करीत आहेत. अविनाश कुमार वर्धेत पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार याची भनक लागताच अनेक दारू विक्रेते आपला व्यवसाय सोडून पसार झाले होते. अशी दहशत होती. परंतु आता ही दहशत दिसत नाही.
पुलगाव जवळ असलेल्या नाचणगाव परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील टेलरिंगच्या दुकानांमध्ये वरली मटक्याचे अवैधरीतीने धंदे सुरू आहेत.
अशातच वारंवार तक्रार देऊनही अधिकारी वर्ग काय करत आहे, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कुठे संगमत नाही झालं असं चित्र दिसून येत आहे. सामान्य व्यक्तीला जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे. त्या ठिकाणी अनेक पुरुष मंडळीची टेलरिंगच्या दुकानांमध्ये वर्दळ दिसते कारणाने महिलावर्ग आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे अशातच वरिष्ठ अधिकारी वर्ग दृष्ट राष्ट्र भूमिका निभवत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.