वर्धा नगराध्यक्ष पदासाठी भाजपने निलेश किटे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्यावतीने युवा उमेदवार सुधीर पांगुळ यांना उमेदवारी दिली आहे. आज दोघांनीही वाजत, गाजत आपला नामांकन अर्ज सादर केला. तर शिवसेनेना (शिंदे गटाच्यावतीने) रविकांत बाळपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आमदार कायदे, संपर्क प्रमुख राजदीक्षीत, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज सादर केला. ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढत असल्याची माहिती आ. मनीषाताई कायदे यांनी दिली.