अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज नियमितपणे सुरू

प्रतिनिधी / है. प्रतापगडचे वारे वर्धा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफवा सोशल मीडियावर विविध माध्यमातून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.

महामंडळाच्या वेब प्रणालीचे प्रलंबित असलेले सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण करणे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत महामंडळामध्ये स्वतःहून एलओए व बँक मंजुरी या दोन सेवा अधिसूचित केल्या आहेत. यानुसार या सेवा १५ कार्यलयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वेच्छेय पाळून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे, एजंटामार्फत लाभार्थ्यांशी होणारी आर्थिक पिळवणूक थांबोवा यासाठी महामंडळाने आपले सेवा केंद्रांद्वारे फक्त रु. ७० पर्यंत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी करार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *