संतरा बागाईतदारांना मागील वर्षाच्या विमा परताव्याची रक्कम तात्काळ अदा करा

वर्धा – वर्धा लोकसभा मतदारसंघातील अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ मोर्चा व त्यालगतचा असलेला काटोल तालुका हा संत्रा पिकाच्या बाबतीत विदर्भाचा कॅलिफोर्निया समजला जातो. या भागातील संत्राचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. मागील वर्षी संत्रा बागाईतदारांनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून संत्रा बागांचा विमा काढला होता.

नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील संत्राच्या आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण होऊन नुकसानभरपाईपोटी इन्शुरन्स कंपनीकडून परताव्याबाबत मंजुरी सुध्दा झालेली होती. परंतु अजून पर्यंत संत्रा बागाईतदारांना मागील वर्षीच्या विम्याची रक्कम अद्यापही मिळाली नाही. यावर्षी पुन्हा दुसऱ्या वर्षीच्या विम्याची रकमेची परतफेड दयायची वेळ आली परंतु रिलायन्स कंपनीने मागील वर्षीच्याच विम्याची राशी अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही.

शेतकऱ्यांनी वारंवार शासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला परंतु प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या भागातील नुकसानग्रस्त व भरपाई मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून खासदार अमर काळे यांचेकडे आपली व्यथा व्यक्त केली व नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत विनंती केली.

खासदार श्री. अमर काळे यांनी संत्रा बागाईतदारांची व्यथा समजावून घेतली व मागील वर्षाच्या पीक विम्याच्या रकमेची परतफेड तात्काळ अदा करणेबाबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री. दत्तामामा भरणे यांना पत्राद्वारे विनंती केली. सर्व संत्रा बागाईतदार शेतकऱ्यांनी खासदार अमर काळे यांनी आपल्या व्यथेची तात्काळ दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *