सेवाग्राम – महात्मा गांधी आरोग्य संस्था, सेवाग्राम अंतर्गत स्थानिक प्रशासन समितीची निवडणूक दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ॲनाटॉमी हॉल येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीमध्ये अध्यापक तसेच क्लास ३ व क्लास ४ कर्मचारी प्रतिनिधी निवडण्यात आले. अध्यापक प्रवर्गातून चार उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी डॉ. प्रवीण झोंपाटे, डॉ. मोहन पेटे आणि डॉ. प्रितम साळुंके हे विजयी ठरले. तर क्लास ३ व क्लास ४ कर्मचारी प्रवर्गातून झालेल्या निवडणुकीत श्री. जितेंद्र नाईक यांनी सर्वाधिक ५७८ मते मिळवून विजय मिळविला. ही निवडणूक पूर्णपणे सुरळीत आणि शांततेत पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. मनीष जैन यांनी निवडणूक प्रक्रियेचे नियोजन आणि संचालन केले. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचे सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
कस्तुरबा आरोग्य संस्थानाची निवडणूक शांततेत पार पडली