वर्धा जिल्ह्यात सहा नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे), देवळी, पुलगाव या सहा नगरपरिषदेमध्ये निवडणूक होत आहे. सर्वच नगर परिषदेमध्ये राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या तसेच स्वतंत्र लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची देखील तयारी केलेली आहे. १० नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. २१ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.
२६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर चिन्ह वाटप देखील होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचार बंद होईल. १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १६ डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर होऊन चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला वेग येईल. २० नोव्हेंबर रोजी प्रचार संपेल. मात्र यामध्ये प्रचाराकरिता अल्प कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे उमेदवार कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
राजकीय पक्षांकडून अद्यापपर्यंत उमेदवारांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून देखील अद्यापपर्यंत प्रचाराला सुरुवात झालेली नाही. चार दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचायचे लागणार आहे. एका भागामधून चार ते पाच हजार मतदार संघ आहे. अशा स्थितीत चार दिवसांत अवघ्या प्रभाव उमेदवारांना पिंजून काढावा लागणार आहे.
निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया देखील पार पाडावी लागणार आहे. त्यात देखील काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.