खासदार अमर काळे यांनी घेतले वर्ध्यात शिर्डी साईबाबांच्या मूळ पादुकांचे दर्शन

वर्धा :वर्धा शहरात शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मूळ पादुकांचे आगमन झाल्याने भक्तांमध्ये भक्तिभावाची लहर उसळली आहे. या पवित्र प्रसंगी खासदार अमर काळे यांनी साई मंदिरात उपस्थित राहून मूळ पादुकांचे सहदर्शन घेतले.

पादुकाच्या दर्शनावळा खासदार अमर काळ यांनी साईबाबांच्या चरणी नम्र अभिवादन करून वर्ध्यातील जनतेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. त्यांनी मंदिर परिसरात मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून भक्तांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.

शिर्डी साईच्या मूळ पादुकांची पालखी मिरवणूक बंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत निघाली होती. जय जय साई रामच्या घोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात हजारो साई भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला.खासदार अमर काळे यांनी सांगितले की, ‘साईबाबांचे दर्शन म्हणजे आत्मिक शांतीचा अनुभव आहे. वर्ध्यात साई भक्तीतून भक्तिभावाचे वातावरण निर्माण होत आहे, हीच खरी प्रेरणा आहे,’ असे ते म्हणाले.

या वेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत व्यवस्था ठेवण्यात आली असून, शेकडो साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. साई मंदिर संस्थानाने भक्तांसाठी विशेष नियोजन केले असून, दर्शन सुरळीत पार पडत आहे.
वर्ध्यातील साई मंदिराला या प्रसंगी शिर्डी साई मंदिराचे स्वरूप लाभल्याचे भक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *