नगरपरिषद निवडणुका जाहीर २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया आता औपचारिकरित्या सुरु झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून हा कार्यक्रम जाहीर होताच उमेदवारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, स्थानिक नेते, माजी नगरसेवक आणि नव्या चेहऱ्यांचे नाव चर्चेत आले आहे.

दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने सर्व विभागांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. प्रचारासाठी केवळ आयोगाच्या परवानगीनेच सभा व प्रचारमिटिंग घेत येणार असून, खर्च तपासणी समिती देखील कार्यरत राहणार आहे. राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्याची हालचाल वेगात सुरु केली असून, तरुण व महिलांना अधिक संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. शहरात निवडणुकीचा माहोल तापू लागला असून, येणारे काही दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजणार हे निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *