राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्ध्याच्या चिमुकल्यांनी घेतली झेप राधवी, ईशा, ओवी यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जयपूर राजस्थान येथे नुकत्याच झालेल्या चार दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत बॉलिवूड प्रकारात स्कूल ऑफ स्कॉलर्सची सहा वर्षीय राधवी दत्ताजी राऊळकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सेमी-क्लासिकल मध्ये ईशा आनंद गाढवकर (वय ९), फोल्क डान्स प्रकारात ओवी अनूप बुरले (वय ६) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

इंटरनॅशनल डान्स काउन्सिल पॅरिस (फ्रान्स) चा सदस्य अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघाच्या वतीने राजस्थान येथील जयपूर शहरात राष्ट्रीय नृत्य स्पर्धा नृत्यारंभचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ओडिसा, आसाम, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात सह देशभरातून अनेक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. यात वर्ध्यासारख्या लहानश्याच्या शहरातून गुरु सचिन डंभारे यांच्या मार्गदर्शनात राधवी राऊळकर,राधवी राऊळकर, ईशा गाढवकर आणि ओवी बुरले यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून देशात वर्धा जिल्ह्याचे नाव उज्वल केले.

या स्पर्धेत परीक्षक म्हणून सुरेखा नायर (मिस इंडिया), संदीप शर्मा, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले सचिन डंभारे उपस्थित होते.

या तिन्ही चिमुकल्यांचे अभिनंदन स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संचालक डॉ. अभय मेघे, प्राचार्य मीनल काळे यांनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, सेंट ॲन्थनी स्कूल (ICSE) च्या संचालिका सि. शालिनी, प्राचार्य सि. शबा यांनीही या तिन्ही विद्यार्थिनींचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक गुरु सचिन डंभारे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *