शहरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा, पेट्रोल भरण्यासाठी वाहन धारकांची झुंबड

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा शहरासह विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपावर मंगळवारी २४ मार्च रोजी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. सायंकाळी वाहन धारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर झुंबड केली. यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा दिसून येत होत्या.

मंगळवारी अचानक सायंकाळी पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. वाहन धारकांची पंपावर लांब रांग लागण्यास सुरुवात झाली. पंपावर वाहन धारकांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी तसेच चारचाकी वाहने देखील मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर आली होती. पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्याने रस्त्यापर्यंत वाहने आली होती. शहरातील विविध पेट्रोल पंपावर अशी परिस्थिती दिसून येत होती. अनेक जण मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते.

अफवांमुळे देखील अनेक जणांनी वाहने पेट्रोल पंपावर आणली होती. वाहनधारकांच्या रांगा पंपाच्या बाहेरपर्यंत आल्या होत्या.

जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *