या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवळीचे आमदार राजेशभाऊ बकाणे, माजी खासदार रामदासजी तडस, ओमप्रकाशजी यादव, गुण्दुभाऊ कावळे, यशवंतराव झाडे, अटलजी पांडे, रणजीत रणनवरे, संजयजी गांधे, अविनाशजी देव आणि आशिषजी ठाकरे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत बांधकाम कामगारांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सुरु असलेल्या या जनआंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
मेळाव्यात स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी बांधकाम कामगारांच्या ज्वलंत समस्या, शासन योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, आणि मंडळांतील अन्यायकारक व्यवहार याबाबत सविस्तरपणे उपस्थित मान्यवर आणि कामगारांना अवगत केले. अध्यक्ष अग्निहोत्री यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमचा संघर्ष सुरु आहे, आणि प्रण निकालात लागेपर्यंत हा लढा थांबणार नाही! स्वाभिमानी संघटना अन्यायाविरुद्ध उभी राहणारच, मग तो लढाई कोणत्याही स्तरावरची असो!”
या मेळाव्यात खालीलप्रमाणे मागण्या शासनापुढे करण्यात आल्या:
१) वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांना नोंदणी करण्याकरिता आवश्यक १०० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्र ग्रामिण भागातील बांधकाम कामगारांना नसून शासन आदेशाचा अनादर करून जाणूनबुजर्वीक ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना त्यांच्या न्याय हक्क पासून वंचित ठेवत आहे. याबाबतीत आमसेवकांवर कार्यवाही व्हावी.
२) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात ऑनलाईन प्रणाली ही बांधकाम कामगारांची शुद्ध फसवणूक.
बांधकाम कामगारांच्या हक्काच्या अनुदान व नोंदणी प्रक्रियेतून निर्माण झालेल्या अन्यायकारक ऑनलाईन प्रणालीपूर्व निवेदन व ऑफलाईन प्रणाली पुर्ववत सुरु करण्याबाबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे बांधकाम कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी निर्माण करण्यात आले आहे.