
तळेगाव आगाराची मोशी- हिंगणघाट यस (क्रमांक एम एच ४० वाय ५ ९५८) अंतोरा येथुन लहान आर्वी कडे येत होती. रस्त्यावर आलेल्या बांबुच्या झाडामुळे रस्त्यावर आलेल्या बांबुच्या झाडामुळे रस्त्यावर समोरून शेतातून मोटार सायकलने घरी जात
असलेले गोविंदराव रामदास कोहळे हे अचानक घाबरल्याने बसच्या पुढील भागात आल्याने अपघात झाला. यामध्ये गोविंदराव कोहळे (वय ६२) गंभीर जखमी झाले.
रस्त्यावर अचानक आलेल्या बांबुचे झाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. जखमीस पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव आगाराच्या सहाय्यक वाहतुक निरीक्षक विद्या ठाकरे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातस्थळी उपस्थित नागरीकांनी सुनिल साबळे यांच्याकडे रस्त्यावरील झाडांची छाटणी करण्याची मागणी केली आहे. साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही. पुढील तपास आष्टी पोलीस करत आहे.