याशिवाय गोंदियाचे संपर्क मंत्री म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. पोलिस कर्मचारी कल्याण समिती मध्ये देखील त्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्य अभ्याक्रम आराखडा निर्माण करण्यात आला आहे.राष्ट्रीय अभ्याक्रम आराखडयाचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टिने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच 5+3+3+4 या रचनेतील शैक्षणिक कार्याचे संनियत्रण आणि सुसूत्रिकरण करण्यासाठी शिक्षण मंत्री श्री. दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सूकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये तीन ते चार सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या सहअध्यक्षपदी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सकाणू समितीच्या सहअध्यक्ष पदी राज्यमंत्री भोयर की नियुक्ती
वर्धा.राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची गुणवत्तापूर्ण व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सकाणू समितीच्या सहअध्यक्ष पदी शालेय शिक्षण मंत्री तथा वर्धा व भंडाराचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.तसा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी 16 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे.डॉ. पंकज भोयर यांच्याकडे गृह ग्रामीण, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पद असून वर्धा व भंडारा जिल्ह्याची पालकमंऋी पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.