महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी वॉर रूमचे उद्घाटन

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती
वर्धा (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी वॉररुमचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महसूल मंत्री व पालकमंत्र्यांनी वॉररुम तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स रुमची पाहणी केली.

जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी सादरीकरणाद्वारे वॉररुममध्ये करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादर केली. या वॉररुममधून एकात्मिक निरीक्षण व सनिंत्रण केले जाणार आहे. डेटा आधारित निर्णय प्रक्रिया, अंमलबजावणीचा मागोवा आणि जिल्हा विकासाच्या प्राधान్యक्रमांसाठी हे एक समन्वयीत केंद्र असणार आहे. याठिकाणी विकासात्मक नियोजन आणि कृतीसंगम, प्रकल्प प्रगती व आढावा डॅशबोर्ड, धोरण निर्मिती व समस्या निवारण, नवीन प्रकल्पांची संकल्पना व आराखडा निर्मिती, माहिती व्यवस्थापन व नियंत्रण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास वॉर रुमची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वॉररुममधून वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प, शक्तिपीठ महामार्ग, नीती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम तसेच मित्राच्या महास्ट्राईड प्रकल्पाचे सनिंत्रण केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *