महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. आज (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला गेले होते. विमान लँड होण्याआधीच कोसळलं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम जाणून घेऊयात.

मुंबईतून निघाल्यावर ३५ मिनिटांत झाला अपघात

अजित पवार व्हीएसआर (VSR) या खासगी विमानाने प्रवास करत होते. त्यांच्या विमानाने मुंबईहून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने टेकऑफ केले होते. बारामतीत ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणं अपेक्षित होतं, पण लँडिंगच्या पाच मिनिटांआधी ८ वाजून ४५ मिनिटांनी ते खाली कोसळलं. अजित पवारांबरोबर एकूण पाच जण प्रवास करत होते.

विमानात कोण-कोण होतं?

उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे पाच जण विमानाने प्रवास करत होते. विमान अपघातात या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर ते कुटुंबियांना सोपवण्यात येतील, अशी माहिती पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंग यांनी एएनआयशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *