प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : राज्याच्या पर्यावरण, वातावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांच्या दौरानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजा मुंडे बुधवारी सकाळी ८.३० वाजता मुंबई येथून प्रयाण करतील. सकाळी ११.४० वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १२ वाजता केळझर येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर महाआरती ला उपस्थित राहतील.
यानंतर सेलू तालुक्याच्या महाराजस्व अभियानाचे उद्घाटन करतील. तसेच सेलडोह येथील पशुसंवर्धन दवाखाना चे उद्घाटन करतील. तसेच सेलू येथील पशुसंवर्धन चिकित्सालय इमारतीचे भूमीपूजन करतील. दुपारी १.१५ वाजता वर्धा येथील हरिराम टॉवर येथे भाजपा युवा मोर्चाच्या संपर्क अभियानाचे उद्घाटन करतील. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागांचा आढावा घेतील. सायंकाळी ५ वाजता आमदार दत्तक ग्राम सालोड हिरापूर येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकरी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहतील. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर देखील उपस्थित राहणार आहे.