प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : पोलीस स्टेशन सावंगी मेघे, वर्धा शहर व रामनगर परिसरात तीन चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या यासंबंधाने तिन्ही पोलीस स्टेशन ला भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२). ३ (५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले. सदर तिन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा पोलीस अधीक्षक, वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल व मा अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सदाशिव वाघमारे यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता त्याचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे चार पथक तयार करुन ज्या तीन ठिकाणी चैन स्नॅचिंग झाली आहे त्याचे रोड मॅप तयार करुन त्या मार्गावरील सर्व सिसिटिव्ही फुटेज तसेच नियंत्रण कक्ष, वर्धा येथील कॅमरांची पाहणी करुन आरोपीचे सिसिटिव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले व त्याचा उपयोग करुन त्या फुटेज मधील चेहरे स्पष्ट करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या जागेचे मोबाईलचे तांत्रिक पडताळणी करुन गुन्ह्यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार हसनैन उर्फ हसन अली जाफर अली, वय २१ वर्ष, रा. भुसावळ, जि जळगांव यास निष्पन्न करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र राज्यात चैन स्नॅचिंगचे बरेच गुन्हे नोंद आहेत व तो जळगांव जिल्ह्यातील पाच गुन्ह्यात काही महिन्यापासुन फरार असुन स्वतःची ओळख लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त केली त्या अनुषंगाने मा पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथक भोपाळ व बैतुल, मध्यप्रदेश या ठिकाणी पाठविण्यात आले.
तेथुन आरोपी हा काही दिवसांपासुन अमरावती येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही पथकांनी अमरावती येथे आरोपी हसन अली याचा शोध घेवून आरोपी हसन अली यास शिताफिने ताब्यात घेत असतांना आरोपीने पळुन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करुन लगेच त्यास ताब्यात घेतले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाने हसन अली यास विचारपुस केली असता आरोपीने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. आरोपीस विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपीने वर्धा जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन पुलगांव हद्दीत सन २०२४ मध्ये दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे, पोलीस स्टेशन रामनगर मध्ये सन २०२५ मध्ये ३ चैन स्नॅचिंगचे गुन्हे व दि. ०९/०३/२०२६ रोजी तीन चैन स्नॅचिंगचे गुन्हे तसेच यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १०/०३/२०२६ रोजी एक चैन स्नॅचिंगचा गुन्हा तसेच माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये मंडला, मध्य प्रदेश येथे एक चैन स्नॅचिंगचा गुन्हा असे एकुण १० चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची माहिती दिली.
सदर गुन्ह्यापैकी सन २०२४ व सन २०२५ चे वर्धा जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे आतंक उर्फ सादिक इबादत अली, वय १/२ ३२ वर्ष, भुसावळ, जि. जळगांव याचे सोबत केले असुन सन २०२६ चे चैन स्नॅचिंगचे गुन्हे हे त्याचा सेंधवा, मध्य प्रदेश येथे राहणारा मित्र मोहम्मद अली हैद्रु अली याचे सोबत केल्याची माहिती दिली. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरण्यात येत असलेली मोटर सायकल दि. ११/०६/२०२५ ला पोलीस स्टेशन चुनाभट्टी, भोपाळ, मध्य प्रदेश हद्दीतुन बजाज पल्सर २०० हि मोटर सायकल चोरी करून सदर मोटर सायकलने सन २०२६ मध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहे. आरोपीने सन २०२४ व सन २०२६ मध्ये केलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील मुद्देमाल स्वतः, पत्नी सुखैना अली व आरोपी मोहम्मद अली हैद्रु अली याची बहिण सना अली रा. भोपाळ, मध्य प्रदेश यांनी अमित खंडेलवाल, रामा ज्वेलर्स, बाडा, ग्वालियर, मध्य प्रदेश याचेकडे गहाण ठेवला होता. आणि सन २०२५ चा मुद्देमाल हा आरोपी हसन अली याचा साथीदार आरोपी आतंक उर्फ सादिक इबादत अली, रा. भुसावळ, जि. जळगांव याने विक्री केल्याची माहिती दिली. आरोपी आतंक उर्फ सादिक अली, रा. भुसावळ हा अटक होणे बाकी असल्याने सन २०२५ मध्ये पो स्टे. रामनगर हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंगचा मुद्देमाल जप्त होणे बाकी आहे. सदर गुन्ह्यात १२६ ग्रॅम ३७० मिलीग्रॅम सोने किंमत १८,४५,०००/- रु, तसेच दोन मोबाईल ज्यामध्ये एक आयफोन किंमत अंदाजे ६०,०००/- रु. किंमत अंदाजे ३५,०००/- रु. एक बजाज पल्सर मोटर सायकल किंमत अंदाजे १,५०,०००/- रु. असा एकुण जुकि २०,९०,०००/- रु. (विस लक्ष नव्वद हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने वरनमुद प्रमाणे जी मोटर सायकल चोरली होती ती फिर्यादीला घेण्याकरीता फक्त ७ दिवस झाले होते.