तत्पूर्वी सकाळी ७ वाजता वृक्षारोपण होईल. सकाळी ९ वाजता गायत्री प्रशांत रोघे तसेच योगेश चांदुरकर, विनय तन्हाडे व संघ संगीतमीय श्रद्धांजली सादर करतील. सकाळी १० वाजता ह.भ.प.नारायणराव महाराज पडोळे यांचे कीर्तन, सत्संग होईल आहे. दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम व त्यानंतर आरती, मौन श्रद्धांजली, जयघोष, प्रसाद व दुपारी २ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. गावकऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश खुबरडे, मनोहर बिजवे, गोपाल गावंडे, प्रशांत काकपुरे, श्रीकृष्ण खिरडकर, राजेश खरुंडे, राजू राऊत, गजानन भोरे, दीपक ढवळे यांनी केले आहे. लोकनेते रमेश वरकड यांच्याविषयी लोकनेते रमेश वरकड हे तीनदा साहूर ग्रामपंचायतचे सरपंच, तीनदा जिल्हा परिषद सदस्य, एकवेळचे पंचायत समिती सदस्य व पं.स.उपसभापती, जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सदस्य व जि.प.सदस्य नसतानाच्या काळात जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त निमंत्रित सदस्य असे तब्बल ३५ वर्षे ते पंचायतराज संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.
लोकनेते रमेशभाऊ वरकड स्मृतीदिन समारोहाचे आयोजन
वर्धा (जिमाका): लोकनेते रमेशभाऊ वरकड यांच्या सातव्या स्मृतीदिन दिनानिमित्त दि. ६ ऑक्टोबर रोजी साहूर येथे समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, भजन, कीर्तन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. यावेळी आ. दादा राव केचे, आ. सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदनताई रमेशराव वरकड, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर, भाजप ज्येष्ठ नेते उत्तमराव करंगळे, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन होले, माजी जि. प. सदस्य छायाताई घोर्डीले, माजी पं. स.उपसभापती गोविंदा खंडाळे, सरपंच प्रकाश गावगवाडे, उपसरपंच रिताताई ढवळे, सावंगाचे सरपंच विनोद सोनोनो, सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर भोरे आदी उपस्थित राहणार आहे.