वर्धेच्या मैदानात रंगणार क्रिकेट प्रीमियर लीग सीजन ०७

१७, १८ ऑक्टोबरला होणार खेळाडूंची चाचणी

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जय महाकाली शिक्षण संस्था आणि वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन प्रस्तुत, वर्धा प्रीमियर लीग सीजन-०७ जिल्ह्यातील वरिष्ठ क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीने वर्धा प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आयोजित हे सामने वर्धा प्रीमियर लीगच्या धर्तीवर खेळविले जाणार आहेत. सदर सामने रामनगर येथील सर्कस मैदानात क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला ०४ डिसेंबर पासून सुरवात होईल तरी त्यामध्ये सहभागी होण्याकरिता खेळाडूंना चाचणी देणे आवश्यक आहे. खेळाडूंची चाचणी १७, १८ ऑक्टोबरला सकाळी ९:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत जय महाकाली शिक्षण संस्थाचा क्रिकेट परिसर मैदानात मध्ये घेण्यात येणार आहे.

वर्धा जिल्ह्यातील नामवंत उद्योजक, व्यवसायिक व क्रिकेटप्रेमी माननीय सचिन अग्निहोत्री आणि संघमालक अंकित पंचभाई, मयूर पुंड, विवेक गावκवाड, ॐ, विपीन राऊत, यश कालेंकर, स्वप्नील चकाण, प्रतीक मेघे, पंकज सराफ, प्रसन्ना चौधरी, पंकज चांदेकर, अतुल पाळेकर, सचिन गरपाल, शौर्य सर यामध्ये सहभागी राहणार आहेत. चाचणी बघून संघमालक स्वतः संघ निवडणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे व चाचणी देणे पण आवश्यक आहे. खेळाडू हा वर्धा लोकसभा क्षेत्रातील असणे आवश्यक आहे.

वर्धा येथील सर्कस मैदानात साखळी पद्धतीने एकूण ५५ सामने खेळविले जाणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी कमेटी मेंबर महेश झाटे, वैभव कवडे, प्रतीक राऊत, अजय पहाडे, सौरभ इंगोले, निलेश नाले, राजेश पवार, भरत पाटील, निखिल चौधरी, शिवम काळे, अमित शूल, निखिल कवडे, गोलू कोकाटे, स्वप्नील चौहान, गजानन राऊत, गोलू इंगोले, विशाल नातं, शैलेश कुरसंगे, आशिष केचे, स्वप्नील, लोकेश नरुले, अनिकेत देवगिरकर, तन्मय सातदेव. यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी कळविले आहे.

प्रतिभावंतांना संधी

वर्धा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या सामन्याच्या रूपाने चांगली मोठी संधी चालून येणार आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन म्हणून भेट वस्तू पण देण्यात याच येणार आहे. याच माध्यमातून खेळाडूंना क्रिकेट खेळाचे नवनवीन तंत्र सुद्धा माहित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *