वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १५९ चालान

एक लाख ४१ हजार रुपये दंड

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. यावेळी १५९ जणांना चालान देत एक लाख ४१ रुपयांवर दंड आकारण्यात आला. मिशन कोंडीमुक्त अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करण्यात आलेल्या वाहनांवर तसेच विना परवाना वाहन चालविणारे वाहन चालक, अल्पवयीन मुले मुलींना वाहने चालविण्यास देणे, ट्रिपल्सिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर असलेले वाहन परवाना बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहनांवर राबविण्यात आले व वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

कारਵਾਈ दरम्यान वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर १५९ चालान केसेस मोटर वाहन कायद्यान्वये करण्यात आल्या. १ लाख ४१ हजार ७५० रुपयांचा दंड करण्यात आला. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १ मोटर सायकलवर कलम १८५ मोबाका प्रकरण नोंद करण्यात आले.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशन्वये व मार्गदर्शनार्थ वर्धा जिल्हा घटकात मिशन कोंडीमुक्त वर्धा अभियान राबविण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक, प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले व पोलीस अधिकारी, वाहतूक अमलदार यांनी वर्धा शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वर्धा शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते अपघातांना आळा घालणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी मिशन कोंडीमुक्त वर्धा अभियान ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *