नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
वर्धा : कथित नीट पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेच्या विरोधात वर्ध्यात कॉक्रोच जनता पार्टी आणि युवा क्रांती यांच्यावतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांतील विद्यार्थी, तरुणांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. फलक घेऊन आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. परीक्षा पद्धती पारदर्शक करावी, पेपरफुटीस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात उपस्थितांनी विचार व्यक्त केले. आंदोलनात सरकारच्या जनसामान्यांविरोधातील धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात नितेश कराळे यांचीही उपस्थिती होती. आंदोलनात हर्ष उबाळे, आतिफ काझी, सक्षम कांबळे, अमन सिद्दीकी, आदर्श वाघमारे, शुभम सिंदारे, आदित्य व्यास, डॉ. पंकज वाघ, विधान वानखेडे, बंटी रंगारी आणि आशिष सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण उपस्थित होते. आंदोलनादरम्यान, तरुणांनी आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.