उपकेंद्रस्तरावर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात

महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा – डॉ रेश्मा बोरघरे

भारताचे प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून तर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत विविध शिबिरे घेऊन महिलांना आरोग्य विषयक आहार विषयक व महिलांच्या योजने विषयक माहिती देण्यासाठी तसेच या अभियानात आरोग्य शिबिरे घेऊन महिलांना होणाऱ्या आजारा ची तपासणे करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्याचा सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

17 सप्टेंबर पासून दररोज उपकेंद्रस्तरावर विविध आजाराबद्दल महिलांच्या तपासण्या करण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा बोरघरे यांनी अभियान शुभारंभ प्रसंगी बोलताना केले

त्या पुढे म्हणाल्या उपकेंद्र स्तरावरील सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी आशा वर्कर यांच्या सहकार्याने महिला लाभार्थ्यांना माहिती देऊन अभियानात सहभागी करून घ्यावे असेही त्या म्हणाल्या. आरोग्य उपकेंद्र कवठा रेल्वे गुंजखेडा नाचणगाव तीन दहेगाव धांदे सोनोरा ढोक येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती लांबट आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे श्याम जोशी स्वाती धोंगडी सिंधू रोकडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्यंकटेश डिकोंडा, प्लेबो साक्षी भावरकर सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर कांचन बाभुळकर, स्वाती बडगे प्राचू अवथरे सुप्रिया भगत, तर आरोग्य कर्मचारी रवींद्र भोगे नेहाल इंगळे प्रसाद माळवे पंकज मेश्राम इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *