जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षमीकरण अभियाना अंतर्गत हेमंत पाहुणे मांडगाव यांनी रू.२०००००/-, हिंमतराव चतुर यांनी रू.१०००००/-, शैलेश साबळे करुर यांनी रु.५००००/ मल्टीपरपज सह. संस्था समुद्रपुरचे वतीने अध्यक्ष श्री. चांगदेव मुंगल यांनी रू.५००००/- , गिरड ग्रामीण सह.पत संस्था गिरड
रु.२०००००/-चे धनादेश ठेव स्वरूपात याप्रसंगी सचिवांना प्रदान करण्यात आले.
सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपुरचे सभापती श्री. हिंमतराव चतुर यांनी श्री. संतोष पाटील साहेब यांचे शाल व पुष्गुच्छ देवून स्वागत केले. श्री. गौतमजी वालदे साहेब प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक सह. संस्था वर्धा यांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपुरचे उपसभापती श्री. वामनराव चंदनखेडे यांनी केले. श्री. स्वप्नील पुराम साहेब यांचे स्वागत श्री. सुरेंद्रजी कुकेकर अध्यक्ष समुद्रपुर खरेदी विक्री संघ यांनी केले.
कार्यशाळेला बाजार समितीचे संचालक, समुद्रपुर खरेदी विक्री संघाचे संचालक, मेहेरबाबा ग्रामीण पतसंस्थेचे संचालक,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष, मल्टीपरपज सेवा सह. संस्थांचे अध्यक्ष व सदस्य,पतसंस्थेचे अध्यक्ष व सदय,बचत गटाचे अध्यक्ष व सदस्य,पीक कर्ज वाटप झालेले नविन व जुने सभासद, बँकेचे जुने व नविन ठेवीदार व मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. भूपेशजी गोहोकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले तर श्री. संजयजी कोरडे व्यव स्थापक यांनी बँकेच्या सद्यस्थिती वर प्रकाश टाकला.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन शंकर धोटे सचिव कृ.ऊ.बा.स.समुद्रपुर यांनी केले तर आभार समुद्रपुर को ऑपरेटिव्ह बँक शाखेचे व्यवस्थापक श्री. मारोतराव मांडवकर यांनी मानले. कार्य शाळेच्या यशस्वीतेसाठी अमोल गौरकर, प्रशांत डोरलीकर, गजानन हजारे, समिर मांडवकर, लक्ष्मण वांदीले, चंद्रशेखर राऊत, जनार्दन राऊत, राजकुमार वागदे, विमल नागपुरे यांनी मेहनत घेतली.