बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी “स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक प्रवेश परीक्षा कोचिंग सहाय्य योजना” सुरू करण्याची उमेश अग्निहोञी यांची मागणी

महाराष्ट्रातील बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश रामसंजीवन अग्निहोत्री यांनी मूखमंञी श्री देवेद्र फङनविस कामगार मंञी श्री आकाश फूंन्ङकर याच्याकङे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी “स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक प्रवेश परीक्षा (MPSC, UPSC, NEET, JEE इत्यादी) कोचिंग सहाय्य योजना” तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

विद्यमान परिस्थिती :

सध्या मंडळामार्फत शैक्षणिक क्षेत्रात शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य वितरण, शैक्षणिक खर्च भरपाई अशा अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक प्रवेश परीक्षा तयारीसाठी कोणतीही थेट आर्थिक मदत उपलब्ध नाही. महागड्या कोचिंग क्लासेस परवडत नसल्यामुळे बांधकाम कामगारांची मुले दर्जेदार मार्गदर्शनापासून वंचित राहतात आणि शासकीय सेवा, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा सहभाग कमी राहतो. परिणामी, सामाजिक असमानता वाढते, असे संघटनेचे म्हणणे आहे.

प्रस्तावित योजनेची वैशिष्ट्ये :

1. अर्थसाहाय्याची तरतूद

MPSC/UPSC/SSC/Banking/Railway आदी स्पर्धा परीक्षा : प्रतिवर्षी ₹750,00/- पर्यंत फी सहाय्य.

NEET व JEE : प्रतिवर्षी ₹90,000/- पर्यंत फी सहाय्य.

फी थेट मान्यताप्राप्त कोचिंग संस्थांना अदा करण्यात यावी.
पात्रता निकष

उमेदवार हा नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मुलगा/मुलगी असावा.
NEET/JEE साठी उमेदवार 10वी उत्तीर्ण होऊन 11वी/12वी विज्ञान शाखेत शिकत असावा.
MPSC/UPSC/इतर स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असावी.
3. प्रशिक्षण व्यवस्था

मंडळाने शासनमान्यताप्राप्त कोचिंग संस्थांची यादी तयार करावी.
जिल्हास्तरावर स्वतःची प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचाही पर्याय ठेवावा.
4. निवड प्रक्रिया

अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जावेत.

वार्षिक लाभार्थ्यांची मर्यादा निश्चित करून पारदर्शक निकष ठरविण्यात यावेत.
प्रगती व परिणाम मूल्यांकन

दरवर्षी योजना लाभार्थ्यांचा अहवाल मंडळासमोर सादर करावा.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या अनुभवांचा प्रसार इतर विद्यार्थ्यांपर्यंत करावा.

सामाजिक परिणाम :

या योजनेमुळे गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शासकीय सेवा, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात न्याय्य संधी मिळेल. कामगारांची मुले समाजात सन्माननीय स्थान मिळवतील. सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि बांधकाम कामगार कुटुंबांचा दर्जा उंचावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे संघटनेचे मत आहे.

निष्कर्ष :

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेने स्पष्ट केले की, मंडळाने या मागणीवर सकारात्मक विचार करून तातडीने “स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक प्रवेश परीक्षा कोचिंग सहाय्य योजना” मंजूर करून अंमलात आणावी. अन्यथा हजारो बांधकाम कामगारांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *