प्रतिनिधी : दै.प्रतापगडचे वारे वर्धा : क्षत्रिय मराठा समाज संस्थेच्या वतीने वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ छत्रपती आंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव रथयात्रेचे दिनांक १५ फेब्रुवारी ला जयघोषात स्वागत करण्यात आले.
नाशिक ते जगन्नाथ पुरी अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा रथयात्रा निघाली असून ही यात्रा वर्धा मुख्य शहराच्या मुख्य मार्गाने नागपूर दिशेने जात असताना या यात्रेत मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध आकारांच्या मूर्ती आहेत.
वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ रथयात्रा आगमनाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी रथयात्रेचे प्रमुख निमंत्रक विजय काकडे पाटील, जगदीश पांगारकर, जिजाऊ माँ साहेबांच्या वंशातील शिवाजी राजे जाधव, शहराचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, क्षत्रिय मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खंडागळे, उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, सचिव नितीन शिंदे, प्रा प्रशांत जाचक, छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवार चे दीपक चुटे इ. मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जयघोषात पुष्पहार घालण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शिवाजी राजे जाधव, सुधिर पांगुळ, संदीप भांडवलकर इ.नी मनोगत व्यक्त करून यात्रा आणि महोत्सवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संचालन प्रा. सुनिल अंभोरे यांनी केले. या प्रसंगी सुभाष पटणकर, राजेश शिंदे, शरद सोनवणे, सचिन गुजर, अमोल वाघ, दीपक कदम, विशाल चोपडे, सचिन खंडारे, विनोद वानखेडे, रूपेश भोयर, आकाश सोनवणे, विशाल आष्टेकर, प्रज्वल शिरभाते, वैभव कदम, राजेश वाकडे, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवार मंडळाचे सदस्य आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.