गोंड प्लॉट येथिल रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही कराः परिसरातील नागरिकांची मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : गोंड प्लॉट, छत्रपति चौक ते पावड़े चौक व ठाकरे मार्केट ते धंतोली चौक) येथील मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी व शालेय वाहनांची वर्दळ असते. सद्यस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. म्हणून, आपण तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज मार्ग उपलब्ध करून द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *