पालकमंत्री डॉ. पंकज भोयर १३ व १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर

वर्धा (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून दोन दिवस विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता न्यू ऑडिटोरीयम, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम येथे आयोजित वर्धापण दिन व वार्षिक स्नेह संम्मेलन कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी १ स्थानिक वाजता कार्यक्रमास उपस्थिती. दि. १४ सप्टेंबर रोजी दाते मंगल कार्यालय वर्धा येथे आयोजित कृषि विभाग कर्मचारी वृंद पतसंस्थेच्या आमसभेस उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे आयोजित सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता गाडगेबाबा मंदिर येथे आयोजित वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३ वाजता चरखा गृह सेवाग्राम येथे आयोजित भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारीत ज्ञान महोत्सव वल्ड रेकार्ड कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नागपूर कडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *