सेलडोह येथे चौपदरीकरणाच्या कामात विघ्नसंतोषी कडून जाणून अडथळे

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू : जिल्ह्याच्या सिमेवर व समृद्धी महामार्गालगत असलेल्या सेलडोह गावाजवळील एनएच ३५३ (१) सेलडोह – ड्रायपोर्ट (सिंदी रेल्वे) मार्गाचे चौपदरीकरणाचे काम मोठ्या धडाक्याने सुरू आहे. या कामादरम्यान सेलडोह गावाला विद्युतपुरवठा करणारा डीपी ट्रान्सफार्मर महाराष्ट्र शासनाच्या नवीन जागेवर बसविण्यात येणार आहे.
मात्र, काही मोजक्या राजकारणी विघ्नसंतोषी व्यक्तींनी विनाकारण विरोध दर्शवून ट्रान्सफार्मर बसविण्याच्या गाडीला तब्बल तीन वेळा अडवले व परत जाण्यास बाध्य केले.
ग्रामपंचायत सेलडोहच्या ग्रामसभेत नवीन डीपी बसविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून नागरिकांकडूनही या मागणीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.
काही लोक विकासकामांना अडथळा निर्माण करून चौपदरीकरण व इंटरचेंजचे काम बाधित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याची पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे तक्रार दाखल केली आहे. यापुढे सदर लोकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन आलेले वाहन परत पाठविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताकडून कंपनीचा आजपावेतो झालेला खर्च त्यांच्या कडून वसूल करण्यात येईल असे संबंधित अधिकार्यांनी बोलतांना सांगितले. गावामध्ये लवकरच नवीन डीपी बसवावी, अशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *