जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या स्व. सिंधुताई सपकाळ सभागृहात आयोजित पिक कर्ज वाटप मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे (ग्रामीण), गृह गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते होणार असून यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यास तालुक्यातील बँक सहभागी होणार असून शिबिरात येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची पिककर्जाची अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी मेळाव्यात येतांना सातबारा उतारा, ८ अ, चर्तुर्सीमा, फेरफार, फार्मर आयडी अग्रीस्टॅक प्रमाणपत्र, आधारकार्ड, उपलब्ध असल्यास पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचे तीन छायाचित्र, बॅक पासबुक, फार्मर आयडी, अॅग्री स्टॅक तसेच आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या कागदपत्रांसह मेळाव्यात उपस्थित राहावे, असे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.