शहरातील कचऱ्याच्या गंभीर समस्येबाबत निराकरण करण्यासंदर्भात वर्धा शहर काँग्रेस तर्फे चर्चा करून निवेदना मार्फत मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा – वर्धा शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, संपूर्ण शहरभर रस्त्यांवर, वस्तीमध्ये, प्रत्येक प्रभाग, बाजारपेठ, रुग्णालय व शैक्षणिक संस्थेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात कचरा साचून दुर्गंधीचा फैलाव झालेला आहे, यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो
यामुळे नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष व नाराजी निर्माण झालेली आहे. या सर्व समस्या, असंतोष व नाराजी लक्षात घेऊन आज गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर ला वर्धा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री सुरेशभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्धा नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी श्री. मोटघरे साहेब यांना खालील ठोस मागण्या निवेदन देऊन करण्यात आले. संपूर्ण शहरातून कचरा तातडीने व नियमित उचलण्यात यावा,
स्वच्छता कर्मचारी व कचरा उचलणाऱ्या वाहनांच्या संख्या वाढविण्यात याव्या, प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण देण्यात यावे, शहरातील स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

नगरपरिषदेने कारवाई करण्यास अपयशी ठरल्यास वर्धा शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेचा हक्क नाकारू नये या प्रकारची चर्चा करून विनंती करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने परवेजभाई खान, अजीमभाई तुरक, प्रशांत कांबळे, अक्षय खडसे, नरेंद्र भुरे, संकेत राऊत, मंगेश गांडुळे, श्रीकांत धोटे, मार्शल राऊत, नदीम रिंकू, अंकुश मुंजेवार, मेहमूदभाई शेख, उदय राऊत इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *