खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश; फळबागा वाचवण्यासाठी विंधन विहिरी खोदण्यास विशेष परवानगी!

शेतकऱ्यांच्या हितासाठी ‌खासदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी; प्रशासनाचा सकारात्मक निर्णय

वर्धा। जिल्ह्यात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विंधन विहिरी खोदण्यावर बंदी घातली hoti. मात्र, या निर्णयामुळे संत्रा बागांसह विविध फळबागा जोपासणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. पाण्याचाभावी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन उभ्या केलेल्या फळबागा वाळण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार अमर काळे यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी, वर्धा व अमरावती यांच्याकडे विशेष परवानगी देण्याची आग्रही मागणी केली hoti. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, अन्य कोणताही सिंचनाचा पर्याय उपलब्ध नसलेल्या फळबाबागधारक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून विंधन विहिरी खोदण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी खालावू नये, या उद्देशाने प्रशासनाने विंधन विहिरी खोदण्यावर निर्बंध आणले होते. मात्र, या सरसकट निर्बंधांमुळे संत्रा बागा और इतर फळबागा जगवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. अनेक शेतकऱ्याकडे सिंचनासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी, वर्धा व अमरावती यांना पत्र देत शेतकऱ्यांची व्यथा मांडली. पाणीटंचाईचे गांभीर्य मान्य असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या संत्रा बागा व इतर फळबागा पाण्याचाभावी धोक्यात आल्या आहेत आणि ज्यांच्याकडे सिंचनासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून विंधन विहिरी खोदण्याची परवानगी देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती.

खासदार काळे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविला. त्यानंतर मुख्यमंत्री स्तरारावर या प्रश्नाचा सकारात्मक विचार करण्यात आला. अखेर ज्या फळबागाधारतक शेतकऱ्यांना आपल्या बागा जगवण्यासाठी पाण्याचा अन्य कोणताही स्रोत उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून विंधन विहिरी खोदण्याची मुभा देण्यात आली आहे. केवल विंधन विहिरी खोदण्याची परवानगी हा विषय नसून, शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्ष्याच्या कष्टाून उभ्या राहिलेल्या फळबागा वाचविण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे होते. याच भूमिकेतून खासदार अमर काळे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या निर्णयाबद्दल खासदार अमर काळे यांनी प्रशासनाचे आभार मानले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः संत्रा उत्पादक आणि इतर फळबागाधारतक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची वेळेत दखल घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी तत्पर असलेले खासदार अमर काळे यांनी पुन्हा एकदा शेतकरीहिताला प्राधान्य दिल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी वाचा फोडणारे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार अमर काळे यांच्या या प्रयत्नांचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *