आयटक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर भरपावसात धडकला मोर्चा

ऑनलाइन कामे देण्यापेक्षा अंगणवाडीतील मुलांना शिकवू द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा जिल्ह्याच्या वतीने दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे जिल्हाध्यक्ष विजया पावडे जिल्हा सचिव वंदना कोळणकर मैना उईके ज्ञानेश्वरी डंबारे अल्का भानसे माला भगत यांच्या नेतृत्वात दयाल नगर रेल्वे स्टेशन येथून विशाल मोर्चाला सुरुवात झाली बजाज चौक नेताजी सुभाषचंद्र चौक झाशी राणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेकरून धडक दिली.

अंगणवाडीच्या मूलभूत कामा व्यतिरिक्त शासन व प्रशासन योजना बाह्य काम करण्यासाठी जबरदस्ती करतात प्रशासनाने येणाऱ्या अंगणवाडीमध्ये गोरगरीब मुलांना शिकवायची की नाही स्पष्ट करावे तसेच सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांनी २०२२ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी असे आदेश दिले असून सुद्धा अजून पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ दिलेल्या नाही,

मंत्रालयीन बैठकीत ठरल्याप्रमाणे दरमहा पेन्शन, आजार पणाच्या रजा, घोषणा केल्याप्रमाणे सेविकांना दोन हजार रुपये व मदतीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता कधी देणार स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण मनिषा कुरसुंगे यांनी आंदोलन स्थळी येऊन स्थानिक मागण्यावर चर्चा केली व राज्यस्तरीय मागण्या तात्काळ शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले मागण्या मान्य झाल्यास ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे असे मत संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले.

राज्यस्तरीय मागण्या बाबत शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल असा इशारा देण्यात आलेला आहे. मंत्री मातृत्व वंदना योजना, चेहरा ओळख प्रणाली चेक काम करण्यासाठी प्रशासनाकडून दडपण आणल्या जात आहे त्यामुळे प्रशासनाने अंगणवाडी केंद्रातील मुलांना केव्हा शिकवावे व योजने व्यतिरिक्त दिलेले काम केव्हा करावे यासाठी आदेश निगमित करावा अशी ही मागणी करण्यात आलेली आहे अंगणवाडी केंद्रात येणारा टी एच आर निकृष्ट दर्जाचा असून खाण्यायोग्य नाही त्यामुळे लाभार्थी घेऊन जात नाही आणि त्यांची चेहरा ओळख करून देण्यास मनाई करतात अशा परिस्थितीत अंगणवाडी कर्मचारी काय करायचं असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

चांगल्या प्रतीचा टी एच आर देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली
यावेळी सुनंदा आखाडे हिरा बावणे शबाना खान कुसुम तळस रेखा नाईक कविता केळवतकर निर्मला देवतळे रेखा कोठेकर सुरेखा रोहनकर अरुणा नागोसे योगिता शिरनाके शांता मुन नुकताच शेवडे सुनीता बोरकर यमुना नगराळे प्रतिभा नैताम लीला ढोबळे इरफान पठाण प्रज्ञा ढाले रजनी पाटील प्रज्ञा उंबरे मला कुत्तरमारे शारदा कांबळे सरला जंगले जागृती नाकले वैशाली वाळके इत्यादी आंदोलनात हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *