कापूस पिकाची वाढ खुंटलेली आहे. शेतकऱ्यांचा खर्च होवुन गेलेला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे. निवेदन देतांना सुधीर कोठारी, माजी आम. राजू तिमांडे, हिम्मत चतुर, सुरेंद्र कुकैकर, गजानन दुर्गे, विनोद हिवंज, योगिता तुळणकर, महादेव बादले, गजानन पारखी, शांतीलाल गांधी, हेमंत पाहुणे, डाँ निर्मेश कोठारी, माया जिवतोडे,शालिक वैद्य,रामभाऊ चौधरी,प्रकाश पिचकाटे, तेजस तडस,अमोलसायंकार, निषादबोरकुटे,अमरझाडे, रणजितचावरे, राजू कटारे, पुरुषोत्तम अरुण बकाल, महेंद्र, सिरोडे, दिनेश कोल्हे, सालवटकर, हरिभाऊ बोबले, जनार्धन हुलके, उमाकांत डभारे, धीरज मांडवकर, गजानन पाहुणे, मनीष गांधी, सुरज फुलझेले, विनोद कान्हालकर, संजय महाकाळकर, नितीन सरोदे, जगन सुमटकर, भोजराज लेवडे, रामदास उमरेडकर, पांडुरंग घाटे, शुभम झाडे, गुरु बावरा, सह बरेच शेतकरी आणि रा. का. अजित पवार गटाचे कार्यकर्ता मोठ्या संख्येयेने उपस्थित होते.
नुकसान ग्रस्त शेतकरऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या ; समुद्रपूर रा.काँ.ची मागणी
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा-तालुक्याभरात सततच्या पावसाने सोयाबिन पिकावर येलो मोझक व बुरशी जन्य रोगाने ग्रासले असुन सोयाबीन पिवळे पडणे व सोयाबीन पिकाचा शेंडा वाकणे या सारखे लक्षणे दिसुन आले आहे. त्यामुळे या वर्षी ही सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट येणार हे निश्चीत आहे. अगोदरच तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला असुन सोयाबीनच्या पिकावर हुमनी अळीचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे फवारणी ही करता येत नाही मागील दोन महिण्यापासुन तालुक्यात संततधार पाउस पडत आहे, त्यामुळे शेतीचे संपुर्ण कामे ठप झाले आहे. अज्ञात रोगाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक पिवळे पडलेले आहे.