सांत्वनभेटीनंतर मंदिरात पोहोचले; केजाजी महाराजांकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : घोराज येथे खोपडे व महुरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर खासदार अमर काळे यांनी घोराज येथील श्रद्धास्थान असलेल्या केजाजी महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
गणेश खोपडे आणि आशीष महुरे या दोन जिवलग मित्रांच्या आकस्मिक निधनाने घोराजपरिषद दुखायचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी केजाजी महाराज मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी केजाजी महाराजांकडे घोराज परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच दुःखाच्या प्रसंगातून जात असलेल्या खोपडे आणि महुरे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
गावातील श्रद्धास्थानाला भेट देत नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासोबतच दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची खासदार अमर काळे यांची भूमिका यावेळी दिसून आली. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, काशनाथ लोणकर, श्री. रामू पवार, उबाठा तालुका प्रमुख अमर बुंदी, राजेश झाडे, विजय घवघवे, अक्रम पठाण, संदीप किटे, फारुख शेख, महाकाळकर, गुजरकर, चुडामन हांडे, अनिल वांदीले, दिपक बिसेन, रोशन वांदीले, योगेश लिक्खार, सतिश तेलरांधे, योगेश गुजरकर, वसंतराव तेलरांधे, बापू वरटकर, मங்கேश काळे, दिपक तेलरांधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.