कृषी विभागात समन्वयाचा अभाव

सेवाग्राम येथील प्रशिक्षण शिबिरात मनमर्जीपणाने शेतकऱ्यांकडून वसूली

खर्च मात्र शासनाचा, यासाठी जबाबदार कोणाचा?

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. परंतु अधिकारी राजकीय अभय यामुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता. इतरांनाच मिळत आहे. सेवाग्राम चरखा गृहात जिल्हा कृषि अधिक्षक (आत्मा) च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण दोन दिवसीय शिबिरात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहे. विशेष म्हणजे कृषि विभागाकडे या प्रशिक्षणासाठी आलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याची माहिती जिल्हा कृषि अधिक्षक उपरीकर यांनी दिल्याने चर्चेला उधान आले होते. तर या प्रशिक्षण शिबिराबाबत माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांकडून ३१०० रुपये नोंदणी फी वसूल करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फक्त ५० रुपये नोंदणी शुल्क होती, तर आयोजक खाजगी युवा शेतकरी ग्रुपने शेतकऱ्यांकडून १ हजार, ३ हजार १००, ६ हजार अशी नोंदणी शुल्क वसूल केली.

याबाबत कोणतीही माहिती कृषि अधिक्षक कार्यालय (आत्मा) कडे उपलब्ध नाही. असे माहिती अधिकारातून मिळालेल्या पत्रात कृषि विभागाने सांगितले आहे. तर या खाजगी संघटनेने मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली, त्याचा हिशोब नाही. तर या शिबिरासाठी कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या जेवणावर १ लाख ५५ हजार १०९ रुपये, चरखा गृहाचे भाडे ६४ हजार ४८४ रुपये व किरकोळ खर्च १० हजार ६७० रुपये तर बॅनर व प्रमाणपत्रेसाठी १९ हजार ६३६ रुपये एवढा खर्च कृषि विभागाच्यावतीने करण्यात आला.तर अनेक शेतकऱ्यांनी कोणतीही नोंदणी केली नाही. शेतकऱ्यांनी मुक्कामाखी आपल्या नातेवाईकांकडे केला. तरी त्यांच्यावर खर्च दाखविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

युवा शेतकरी ग्रुपने या शिबिराच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा केला असून तिचा हिशोब कृषि विभागात नाही. ही शोकांतिका आहे.  हे शिबिर ३ व ४ ऑक्टोबरला सेवाग्रामच्या चरखा गृहात कृषि विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *