खासदार अमर शरदराव काळे यांची प्रशासनाकडे मागणीलोकवाहिनी न्यूज,वर्धा : जिल्ह्यातील मांडवा येथे लँको विद्युत प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम सुद्धा सुरू झाले होते. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. परंतु अचानक या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले, त्यामुळे हा प्रकल्प बंद पडल्यामुळे या प्रकल्पात मांडवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ज्या उपजाऊ जमिनी प्रकल्पाकरिता घेण्यात आल्या होत्या तो प्रकल्प बंद पडल्याने या परिसरातील भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना व इतरही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी शेती करण्यासाठी परत करण्यात याव्या अशी मागणी खासदार अमर काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वर्धा जिल्ह्यात मांडवा येथे लँको विद्युत प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम सुद्धा मोठ्या जोरात सुरू झाले होते. प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामुग्री सुद्धा प्रकल्पस्थळी आणण्यात आली होती व हा प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होती. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मांडवा व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. आपल्या गावात किंवा गावाजवळ लँको नावाचा विद्युत प्रकल्प साकारणार व जिल्ह्यातील बेरोजगार मुलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाकरिता दिल्या. यात बरेचशे शेतकरी भूमिहीन झाले. परंतु जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प नावारूपाला येऊन जिल्ह्यामध्ये बेरोजगारांना कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होईल, शहरातील बाजाराची उलाढाल वाढेल व जिल्ह्याच्या विकासात एक मानाचा तुरा रोवला जाईल असा आशेचा किरण वर्धा जिल्हा वासियांकरिता एक काळ दिवस ठरला व उरल्या सुरल्या बेरोजगारांच्या तसेच ज्या कुणाला या प्रकल्पातून व्यापारिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने व इतर विकासात्मक दृष्टीने व जिल्ह्याचा विकासाचा विचार करता हा प्रकल्प बंद होणे म्हणजे एका दृष्टीने वर्धा जिल्ह्याची विकासाची वाटचाल खुंटली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बरेच दिवसांपासून हा प्रकल्प बंद अवस्थेत असून भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावे व आपला गमावलेला रोजगार व हरवलेला व्यवसाय पुन्हा सुरू करावा या दृष्टीने या भागातील शेतकऱ्यांनी आमची घेतलेली जमीन आम्हाला परत देऊन आमच्या दोन वेळेच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था तरी या शेतीतून करू द्या अशी आर्त मागणी बऱ्याच कास्तकारांकडून खासदार अमर काळे यांना करण्यात आली. या भागातील लोकांची मागणी व सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता खासदार अमर काळे यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन या प्रकल्पाची सद्यस्थितीची रास्त मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाकडून हा प्रकल्प पूर्णविराम देत बंद पडल्याची खात्री पटल्यानंतर खासदार अमर काळे यांनी प्रशासनाला पत्र देऊन ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पाकरिता घेण्यात आल्या होत्या त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कसण्याकरिता देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची तरी व्यवस्था करून द्या व त्यांना आपल्या गावात पूर्वापार चालत आलेल्या शेतीचा व्यवसाय पुन्हा करू द्या अशी मागणी खासदार अमर काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे मांडवा व आजूबाजूच्या सर्व प्रकल्पग्रस्त लोकांचे डोळे याकडे लागलेले आहे. खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांची व तेथील बेरोजगारांची परिस्थिती लक्षात घेता प्रशासन या प्रकरणी निश्चितच सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा व्यक्त केली.