स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेटचा चांगला उपयोग होईल : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

महाज्योतीच्यावतीने विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

वर्धा (जिमाका) : सोशल मीडियाच्या काळात स्पर्धेत टिकून राहणे फार महत्त्वाचे आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टाकुण्यासोबतच आपले करीअर करण्याची उत्तम संधी टॅबलेटच्या माध्यमातून मिळणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटकya जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जेईई, नीट, एमएचटी सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमचे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, इतर मागासबहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष गवई, महाज्योतीचे दिपेंद्र मोदी, अनिकेत चौधरी आदी उपस्थित होते.

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड विरोध झुगारून वंचित, गरीब, मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांच्या विचारतला समाज निर्माण करण्यासाठी शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी निर्माण करून देण्याचे काम राज्य शासन करत असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पुढे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले करीअर करताना तणावात न राहता महाज्योतीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन करीअर करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

प्रस्ताविक करताना संतोष गवई म्हणाले, महाज्योतीच्यावतीने जिल्ह्यातील १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला व ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या जेईई, नीट, एमएचटी सीईटी या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील ६१ विद्यार्थ्यांना टॅबलेट व ६ जीबी प्रति दिवस डाटा असलेले सिमचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *